Chhattisgarh

व्यापारी ला आत्महत्या प्रवृत्त करणारी असल्याचा आरोप भाजपा आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे

अकोला: covid-19 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने नवीन नियमावली ही अराजकतेला निमंत्रण करणारी व व्यापारी वर्गावर अन्याय करणारी तसेच धंदा संपून संपून व्यापारी ला आत्महत्या प्रवृत्त करणारी असल्याचा आरोप भाजपा आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे.

covid-19 तिच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना थांबण्यासाठी विविध उपाययोजना व नियमावली तयार केली आहे. लस न घेणारे नागरिकांना पाचशे रुपये दंड व दुकानात ग्राहक लसीकरण न घेतलेला आढळल्यास दहा हजार रुपये दंड आकारणीचा निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा व अराजकता निर्माण करणारा तसेच त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा असल्याचा आरोप आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांनी करून व्यापाऱ्यांना त्रास देणे, खंडणी वसुली करण्यासारखा हा प्रकार राज्य शासन आणि शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे. लसीकरण करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे परंतु ग्राहकांनी लसीकरण घेतले नाही याची खातरजमा व्यापारी कसा करणार आहे. सध्या दोन वर्षानंतर नीट व्यवसाय सुरू झाल्यानंतर असा प्रकार करून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीने केला आहे. प्रत्येक नियम बंधन केवळ व्यापारी वर्गावर का ?असा सवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला आहे सारे नियम कायदे ग्रुप आली वर्गासाठी जाय काय? नेते व राजकीय पक्ष व विविध कार्यक्रमासाठी सूट व व्यापाऱ्यांना भुर्दंड? हा प्रकार कशासाठी? सवाल करून व्यापारी वर्ग हा भाजपाचा मतदार असल्यामुळे तर असा प्रकार करत नाही काय असा सवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकरयांनी उपस्थित करून व्यापारी वर्ग हा नियमाने चालणारा व शोषण करण्यासाठी सुलभ असल्याचा शोध शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने लावून व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या दृष्टीने हा नियम लागू केला काय नियमावली जाहीर केली काय हे नियम परत घेण्यात यावी यासाठी राज्यपाल महामहिम भगतसिंग कोशयारी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकरांनी लक्ष केंद्रित करून व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन राज्यात अराजकता निर्माण होणे या दिशेने तसेच ग्राहक आणि व्यापारी यांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे.

 

संवाददाता:: शाहिद इक़बाल,अकोला

Related Articles

Back to top button